नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली आणि तेलंगणानंतर आता युपीतील नोएडामध्येही कोरोना व्हायरसचा शोध लागला आहे. याबाबत गौतमबुद्ध नगर येथे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. अनुराग भार्गव आणि एसीएमओ डॉ. सुनील दोहरे यांनी एका संशयिताला शुक्रवारी दिल्लीच्या हयात हॉटेलमध्ये आपल्या मुलाच्या बर्थडे पार्टी केली असल्याचे सांगितले. २८ फेब्रुवारीला ही पार्टी झाली होती. नोएडाच्या दोन कुटुंबांनी या पार्टीला हजेरी लावली होती. सीएमने म्हटले की, या पूर्ण घटनेची सूचना युपी सरकारला दिली आहे.
नोएडामध्ये कोरोना व्हायरस आल्याची सरकारी अधिकाऱ्यांनीही पुष्टी केली आहे. यात म्हटले आहे की, २८ फेब्रुवारीला ज्या संशयिताला दिल्लीतील एका हॉटेलमध्ये पार्टी दिली होती, त्याला कोविड-१९ ग्रासल्याची पुष्टी झाली आहे. यात पुष्टीनंतर हॉटेलकडून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात गेस्ट आणि सहकाऱ्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि त्यांची सुरक्षा आमच्यासाठी प्राथमिकता आहे, असे म्हटले आहे. कोरोना व्हायरसची सूचना मिळताच आणि सरकारकडून आदेश मिळताच आम्ही सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. हॉटेलचे रस्ते, पब्लिक एरिया, लॉकर्स आणि मिटिंगच्या जागांमध्ये साफसफाईचे काम चालू केले आहे.
हयात हॉटेलच्या निवेदनात म्हटले आहे की, “२८ फेब्रुवारीला रेस्टॉरंटमध्ये असलेल्या सर्व कर्मचार्यांना १४ दिवस स्व-देखरेखीखाली राहण्याचे सुचवले गेले आहे.” हॉटेलमध्ये येणारे सर्व कर्मचारी आणि कंत्राटदारांचे तापमान देखील सतत मोजले जात असून सध्या कोणत्याही हॉटेल स्टाफमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झालेली नाही. पुढच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवली जात आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेली असून त्यांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. जेणेकरुन हॉटेलमधील अतिथी आणि कर्मचारी निरोगी वातावरणात जगू शकतील.
कोरोना व्हायरसने दहशत पसरली असून नोएडानंतर आग्रामध्ये कोरोना विषाणूचे ६ संशयित आढळले आहेत. हे तेच लोक आहेत जे इटलीहून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असून सध्या या सर्व १३ जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. तसेच त्यांचे नमुने पुण्याच्या वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सरकारने सांगितले की, आग्रामध्ये १३ लोकं आढळले आहेत. त्यामध्ये कोरोना विषाणूची (कोविड -१) लक्षणे आढळली असून या १३ जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच त्यांचे नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत. यासह या १३ जणांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही तपासणी सुरू झाली आहे.