बहुजननामा ऑनलाईन
कोरोना विषाणूवर सलग चालू असलेल्या अभ्यासांनुसार नवनवीन युक्तिवाद समोर येत आहेत. आता एका अभ्यासानुसार कोविड -19 (Covid-19) च्या कारणामुळे पुरुषांच्या सेक्स हार्मोन्स (Sex Hormones) टेस्टोस्टेरॉन (testosterone) च्या पातळीत घट होत असल्याचे समोर येत आहे. ज्यामुळे पुरुषांची कामेच्छा (Loss of Libido) वर वाईट परिणाम होत आहे. संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की शुक्राणूंच्या (Hormones) पातळीत अडथळे येत असल्यामुळे पुरूषांची आजारांविरूद्ध लढण्याची क्षमता देखील कमी होत आहे.
पुरुषांमध्ये कमी होत आहे आजारांशी लढण्याची क्षमता
मेर्सिन युनिव्हर्सिटी (University of Mersin) च्या युरोलॉजीचे प्राध्यापक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक सेलाहिटिन कायन (Selahittin Cayan) यांच्या मते, आधीपासूनच असे नोंदवले गेले आहे की टेस्टोस्टेरॉनची कमी पातळी पुरुषांमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता कमी करते जे की SARS-CoV-2 चे कारण ठरू शकते, परंतु कोविड -19 टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करतो असा दावा करणारा हा पहिला अभ्यास आहे.
संशोधकांचे काय म्हणणे आहे
संशोधकांचे म्हणणे आहे की या अभ्यासाच्या आधारे हे समजू शकेल की कोविड -19 च्या बाबतीत स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता का कमी होत आहे. म्हणूनच टेस्टोस्टेरॉनच्या उपचारांच्या आधारावर चिकित्सक क्षेत्रात संभाव्य सुधारणांची अपेक्षा केली जाऊ शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की टेस्टोस्टेरॉन श्वसन अवयवांच्या रोगप्रतिकारक शक्तीशी (Immunity System) संबंधित आहे, ज्यामुळे हार्मोन्सची पातळी कमी झाल्याने श्वसन संक्रमणाचा धोका अधिक वाढतो. दरम्यान अभ्यासात आढळले आहे की गंभीर कोविड -19 संक्रमित पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्सच्या पातळीत घट झालेली आहे.
संशोधक कायन यांनी सांगितले की आयसीयू (Intensive Care Unit) मध्ये दाखल कोविड-19 च्या रुग्णांपेक्षा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये टेस्टोस्टेरॉनची एकंदर सरासरी पातळी चांगली असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय इंटरमीडिएट केअर युनिट (Intermediate Care Unit) मधील रुग्णांच्या तुलनेत देखील आयसीयू (Intensive Care Unit) च्या रूग्णांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी पुरेशी नाही.
कोरोना रूग्णांमध्ये आढळली ही मोठी कमतरता
तसेच संशोधकांनी असे म्हटले आहे की आयसीयूमधल्या रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांपेक्षा उत्तेजक हार्मोन्सची पातळी जास्त असल्याचे आढळले आहे. कायन यांच्या म्हणण्यानुसार हायपोगोनॅडिझम (Hypogonadism) ही अशी स्थिती आहे जी की 51.1 टक्के पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत कमतरता निर्माण करते. अभ्यासानुसार, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्सच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट आढळली आहे. त्यांनी असेही सांगितले की 46 पैकी 65.2 टक्के सौम्य लक्षणे असलेल्या पुरुषांमध्ये कामवासनेची तक्रार समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी 232 पुरुषांसह एकूण 438 रुग्णांचे मूल्यांकन केले, त्यापैकी प्रत्येकामध्ये एसएआरएस-सीओव्ही -2 (SARS-CoV-2) ची पुष्टी झाली.
टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर उपचार करणे महत्वाचे
या अभ्यासावरील संशोधकांनी म्हटले आहे की यामध्ये कोविड -19 व्यतिरिक्त इतर रोगांच्या गटातील रुग्णांचा समावेश केलेला नाही. कोविड -19 च्या उपचाराबरोबरच रूग्णाच्या टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवरही उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की यामुळे रुग्णाला असणाऱ्या रोगांविरोधात लढा देण्याची क्षमता वाढेल.