बहुजननामा ऑनलाईन- Corona Vaccination भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. दररोज चार लाखाहून अधिक आढळणाऱ्या बाधितांची संख्या आता दोन लाखांच्या खाली आली आहे. त्यातही घट सुरु झाली आहे. दरम्यान, परिस्थिती बदलत असतंच तिसऱ्या लाटेचे संकेत दिले गेले आहेत. दुसरीकडे लसींच्या टंचाईमुळे ब्रेक लागलेल्या लसीकरणाला आता वेग देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मात्र लसीबाबत अनेकांमध्ये गैरसमज आहेत. लस घेऊनही कोरोना होत असेल तर मग लस घायचीच कशाला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्तर प्रदेश मध्ये नुकतीच एक घटना घडली. कोरोना लसीकरण अभियान राबवण्यासाठी गेलेल्या पथकाला पाहताच ग्रामस्थांनी नदीत उडी घेतली. त्यामुळे लसीकरणबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. अमेरिकेतील ओहियो राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भन्नाट योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यपाल माइक डेविन यांनी लॉटरी पद्धतीनं बक्षीसं दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्ती लॉटरीमध्ये सहभाग घेऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे वृत्त द गार्डियनने दिल आहे. हि लॉटरी जिंकणाऱ्या सर्वांना १० लाख डॉलर (७.३ कोटी रुपये) दिले जातील. विशेष म्हणजे या जॉयनेची घोषणा होताच पहिल्या आठवड्यातील लॉटरीसाठी तब्ब्ल २७ लाख लोकांनी अर्ज केला केला होता. लॉटरीत सहभागी होणाऱ्यांसाठी १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी एक गट, तर ते १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या व्यक्तींसाठी दुसरा गट तयार करण्यात आला आहे. दर आठवड्याला पाच विजेत्यांची घोषणा केली जाईल.
या योजनेचे वैशिष्ट म्हणजे १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या विजेत्या व्यक्तींना रोख रक्कमे एवजी चार वर्षांची शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यात ट्यूशन फीज आणि रुमच्या खर्चाचा समावेश असेल. मात्र त्यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. या योजनेचा संपूर्ण खर्च ओहियो प्रशासन करणार असून कोरोना महामारीसाठी केलेल्या निधींतून हा खर्च केला जाईल. या संपूर्ण खर्चाचा हिशोबदेखील ठेवण्यात येणार आहे. सध्या या योजनेमुळे ओहिओ राज्य चर्चेत आल आहे. मात्र त्याचा लसीकरणाला किती फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल.