पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मद्यपान(Alcohol) करून सतत भांडण करत असल्याच्या कारणावरून पाच जणांनी दोघांना मारहाण करत घरावर दगडफेक केल्याची घटना वानवडीत घडली आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
निलेश एडके (वय 26) व मिलींद एडके (38) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण भंडारे (वय 55) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा खंडू हा सतत दारू पिऊन येत असत. यामुळे त्यांच्यात वाद होत असत. दरम्यान तो कालही मद्यपान करून आला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरू होते. यावेळी आरोपींनी रोजच भांडण असते म्हणून शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे फिर्यादी यांचा दुसरा मुलगा सचिन याने शिवीगाळ का करताय असा जाब विचारला असता या रागातून पाच जणांनी सचिन याला लथाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केले आहेत. तर फिर्यादी हे पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आल्यानंतर घरावर दगडफेक केली आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.