नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूर महापालिकेच्या वतीने संविधान चौकात संविधानांची उद्देशिका असलेला शिलालेख उभारण्यात येणारआहे. या शिलालेख कार्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते (बुधवारी) ६ मार्च रोजी भुमिपूजन झाले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, पश्चीम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलींद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती तसेच कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव आदी मंडळी उपस्तीथी होती.
महापालिकेच्या वतीने हा शिलालेख उभारण्यात येणार आहे. हा शिलालेख १८ ते २० फूट उंचीच्या या शिलालेख ३ भाषेत राहणार असून. त्यावर संसदेची प्रतिकृती राहणार आहे.या शिलालेखाचे बांधकाम पिवळ्या व लाल सॅन्डस्टोनने करण्यात येईल. यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मराठी. हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पॉलीमार्बल दगडावर कोरलेली असेल.
तसेच या स्मारकाची प्रतिकृती संसद भवनाप्रमाणे करण्यात येणार आहे. संविधाच्या प्रतिकृतीवर राजमुद्रा तसेच अशोक स्तंभची प्रतिक्रती असेल. अशी माहिती जाधव यांनी दिली.