नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसवाले मोदींचा एवढा द्वेष करतात कि, त्यांना मोदींना मारण्याची स्पप्ने पडत आहेत.असे धक्कादायक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. परंतु, सारे देशवासीय माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा आहेत याचा काँग्रेसला विसर पडला आहे, असेही मोदी म्हणाले. मध्यप्रदेशच्या इटारसी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसवाले माझा खूप तिरस्कार करतात. तसेच मला ठार मारण्याची त्यांची इच्छा आहे. विरोधी पक्षांतील अनेकांना पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. पण त्यातील कोणाचीही विरोधी पक्षनेताही बनण्याची क्षमता नव्हती.
एका कुटुंबाने देशावर ५५ वर्ष सत्ता गाजवली त्यांच्याविरोधात ‘चहावाल्या’ची ५५ महिन्यांची सत्ता आहे यातील योग्य फरक काय आहे, हे नीट पारखून एकाची निवड करा, असे आवाहन मोदी यांनी केले.