मुंबई बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या असतानाच लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी पाच मतदारासंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये लातूर, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसकडून अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर येथे विनायक बांगडे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. नरेश पुगलिया आणि विजय वड्डेटीवार गटातील मतभेदाच्या वादात अखेर बांगडे यांच नाव समोर आलं आहे.
मतदारसंघ आणि काँग्रेस उमेदवार
१)चंद्रपूर-विनायक बांगडे
२)जालना- विलास औताडे
३)औरंगाबाद- सुभाष झांबड
४)भिवंडी- सुरेश तावरे
५)लातूर- मच्छिंद्र कामत