सातारा : बहुजननामा ऑनलाईन – कराड येथे बहुजन शिक्षक परिवाराकडून छ. शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत निकम, माजी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ गायकवाड, शिक्षण विस्ताराधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख धामवडकर, बहुजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण लादे यांनी अभिवादन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष राजाराम कारंडे, महेश लोखंडे, उमेश सागरे, मा. सा. जाधव, आबासाहेब खरात, सुरेश चव्हाण, अजित वाघमारे, उदय भंडारे, रशीद तांबोळी, चंद्रकांत गायकवाड, मुबारक भालदार, आबासाहेब साठे, सागर मुळे, सुरेश तेली, डाकेसर, महादेव देशमाने, हणमंत साठे, अडसुळे, सुरेखा वायदंडे, शारदा लोकरे, शबाना संदे, सुनंंदा पाटणकर, मनिषा माने, प्रतिक्षा लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.