जयपूर : बहुजननामा ऑनलाइन – आजकाल महागाईमुळे “सेकंड हॅन्ड” गोष्टी खिशाला पडवरणाऱ्या असतात. त्या नीट पारखून घेतल्या तर ठीक नाहीतर काही दिवसातंच फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु कधी कधी त्याच जुन्या गोष्टी फार फायदेशीर ठरतात. अशीच एक घटना अमेरिकेतील पल्टज मध्ये घडली. जेथील स्टेट युनिव्हर्सिटीच्या रिसो वेरखोवे, क्वॉलि गास्टी आणि लारा लूसो या तीन विद्यार्थ्यांनी मिळून भाड्याने एक रूम घेतली आणि घरासाठी उपयुक काही वस्तू देखील घेतल्या. त्यात त्यांनी अवघ्या १३०० रुपयांचा सोफा देखील घेतला.
काही वेळा नंतर जेव्हा ते तिघे सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते, तेव्हा त्यांना काहीतरी गडबड असल्याचे आढळले. जेव्हा त्यांनी सोफ्याचा वरचा भाग काढून पाहिला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला ! सोफ्याच्या आत त्यांना जुने पाकीट सापडले.
त्यात त्यांना ७० हजार रुपये मिळाले. त्यांनी अजून सोफा उलगडल्यावर त्यांना जवळपास ४१ हजार डॉलर म्हणजेच २९ लाख रुपये मिळाले. त्यातल्या त्यात त्यांना बँकेची पैसे भरण्याची स्लिप सुद्धा मिळाली. एवढं घबाड मिळाल्या नंतर कोणीही स्वतःची ऐश भागवली असती. परंतु त्यांनी असे न करता पैसे त्या मालकाला देण्याचा निर्णय घेतला. स्लिप वर दिलेल्या पत्त्याच्या आधारे ते घरी गेले असता त्यांना एक वयस्कर महिला भेटली. महिलेने सांगितल्या प्रमाणे त्यांच्या वडिलांनी हे पैसे बँकेत जमा करण्यासाठी ठेवले होते. पतीच्या रिटायरमेंट नंतर त्यांना हे पैसे मिळाले होते. त्या विद्यार्थ्यांनी ते पैसे त्या वृद्ध महिलेला दिले.