बहुजननामा ऑनलाईन टीम – एका ब्रिटिश पर्यटकाने नशेत असताना चुकून ५४ हजार रुपयांची दारूची ऑर्डर केली आणि जेव्हा बिल द्यायची वेळ आली तेव्हा त्या पर्यटकाने त्या हॉटेलच्या मालकाची माफी मागितली. व पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्या हॉटेल वाल्याने पोलिसांना बोलवून त्याला पोलिसांच्या हवाली केलं.
या प्रकरणाबद्दल अधिक माहिती अशी की, स्पेनमधील ईबीजा आयलंडमध्ये एका ४२ वर्षीय ब्रिटिश पर्यटकाचे हॉटेलचे बिल ६८ हजार रुपये आले होते. या पर्यटकाने हे बिल देण्यास या पर्यटकाने नकार दिला तेव्हा या पर्यटकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या आरोपीला कोर्टाने ४ महिन्याची निलंबित शिक्षा दिली आहे आणि कोर्टाने हे ही सांगितले आहे की, तो आरोपी पैसे देऊन आपली आता सुटका करू शकतो.
मागच्या महिन्यात असच एका इटालियन पर्यटकाने फोर्मेन्टेरा आयलंडवर काही खाद्य पदार्थ खाल्यावर बिल न दिल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्या पर्यटकाच बिल ३२ हजार रुपये आलं होत. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने पैशाच्या बदल्यात आपले कपडे ऑफर केले होते.