बहुजननामा ऑनलाइन टीम –लखीमपुर-खीरी ः वृत्त संस्था – पैशांच्या बदल्यात 4 झाड तोडण्याची परवानगी देणा-या पोलीस अधिका-याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल(Collect money) झाला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यात(Collect money) लखीमपुरा खीरी हे भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे ठिकाण मानले जाते.
तिकुनिया कोतवालीमध्ये पोलीस निरीक्षक हनुमंत प्रसाद हे लाकूड कंत्राटदाराला भ्रष्टाचाराचे ज्ञान पाझळताना व्हिडिओत दिसून येत आहेत. पोलीस ठाण्यात पैसे जमा केल्यानंतर एका झाडाऐवजी ओव्हरलोडिंग आणि 4 झाडे तोडण्याचा सल्ला ते वन विभागाच्या कंत्राटदाराला देत आहेत. तसेच त्यासाठी लागणारी परवानगी देऊ फक्त पैसे वेळेत पोहोचते करा, असा सल्ला देताना ते कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकाची चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.