मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टाटा समूहाचे (Tata Group) सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा (Senior Businessman Ratan Tata) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची (CM Eknath Shinde) जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटीगाठी घेत आहेत. शिंदे यांनी निवासस्थानी भेट घेतल्यानंतर रतन टाटा यांनी मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यामध्ये काही वेळ दिलखुलास गप्पाही रंगल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. @RNTata2000 यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी माझे मनापासून अभिनंदन केले तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/xDmtuLrGiZ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
राज्यात सुरु असलेली विकासाची कामे रद्द होणार नाहीत. लोकहिताच्या कामांना स्थगिती नाहीच. मागील सरकारच्या शेवटच्या दिवसांत घाईघाईने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. दरम्यान रतन टाटांची ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रतन टाटांनी मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्याबाबत सर्वच क्षेत्रातील दिग्गज आदर बाळगतात.
राजकीय नेतेही याला अपवाद नाहीत. याआधीही विविध पक्षाच्या नेत्यांनी रतन टाटा यांची भेट घेतली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde meets ratan tata all the best for your career as chief minister
हे देखील वाचा :
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्यांना होणार दुहेरी आनंद, DA सोबत आणखी एक वाढ !