मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Meeting | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट 50 हजारांचे अनुदान (Subsidy to Farmers) देण्यात येणार आहे. नियमित कृषी कर्ज (Agricultural Loan) फेडणाऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति युनिट 1 रुपयांची वीज सवलत (Electricity Discount) देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) झाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनुदान योजनेचा 50 हजार शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच कर्ज फेडीची मुदत तीन वर्षांची मुदत दोन वर्षावर आणली आहे. हजारो एकर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच भातसा धरणासाठी 1550 कोटींची मान्यता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) देण्यात आली.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
– राज्यात वीज वितरण यंत्रणा सुधारणार. ग्राहकांना स्मार्ट व प्रिपेड मीटर्स.
महावितरण व बेस्ट उपक्रमामार्फत सुधारित वितरण क्षेत्र योजना – सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती – आधारित योजना (Revamped Distribution Sector Scheme Reforms-Based and Results-Linked) (ऊर्जा विभाग -Energy Department)
– अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार. (ऊर्जा विभाग)
– दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती (विधि व न्याय विभाग – Department of Law and Justice)
– विधि व न्याय विभागात सह सचिव (विधि) (गट-अ) पद नव्याने निर्माण करणार. (विधि व न्याय विभाग)
– लोणार सरोवर जतन, संवर्धन व विकास आराखड्यास मान्यता. (वन विभाग – Forest Department)
– 15 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical Colleges) वाढलेल्या 50 अतिरिक्त जागांसाठी राज्याचा हिस्सा (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग – Department of Medical Education and Medicines)
– राज्यात कायम स्वरूपी विनाअनुदानित तत्वावर 3 नवीन समाजकार्य महाविद्यालये स्थापणार (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – Department of Social Justice and Special Assistance)
– ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास 890.64 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग – Department of Water Resources)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
– जळगांव जिल्ह्यातील वाघुर प्रकल्पास 2 हजार 288.31 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
– ठाणे जिल्ह्यातील भातसा पाटबंधारे प्रकल्प 1 हजार 491.95 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
– हिंगोली जिल्ह्यात ‘मा. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ (कृषि विभाग -Department of Agriculture)
– शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान. पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा लाभ (सहकार विभाग)
– ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थीना जागा देण्याबाबत विविध सवलती (ग्राम विकास विभाग)
– राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च 2022 पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत कार्यवाही (गृह विभाग)
Web Title : – Maharashtra Cabinet Meeting | 50000 subsidy to farmers rs 1 electricity subsidy per unit cm eknath shinde and devendra fadnavis big announcements cabinet decisions
हे देखील वाचा :
Ranveer Singh | टेन्शन नाही घ्यायचं, उपदेश नाही द्यायचा…’ टाटाच्या बॉसने दिला रणवीर सिंहला सल्ला