श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये दहशतवादी आणि सैनिकांमध्ये चकमक सुरु आहे. यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यास सैनिकांना यश आले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे.
काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील गुडुनामध्ये रविवारी सकाळपासून ही चकमक सुरु आहे. भारतीय जवानांनी दहशतवादी लपलेल्या भागाला चारही बाजूने घरेले आहे. दहशतवाद्यांनी एका घराचा आसरा घेतला आहे.
दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार केला जात आहे.दोडा जिल्ह्यामध्येच गेल्या महिन्याच्या सुरुवातीला हिजबुल मुजाहिद्दिनीच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.