बहुजननामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर्स पुरवठा करण्याची मोठी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करू असे ट्रम्प म्हणाले आहे.त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीटनंतर ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
twitter.com/narendramodi/status/1261581118458888192
कोरोनाच्या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. व्हेंटिलेटर देण्याच्या घोषनेनंतर पीएम मोदी यांनी ट्विटमध्ये,ट्रम्प यांचे आभार मानले.आम्ही सर्वजण या साथीच्या विरोधात एकत्रितपणे लढा देत आहोत.अशा वेळी, राष्ट्रांनी एकत्र काम करण्यासाठी जितके शक्य असेल तितके सहकार्य करणे आणि जगाला कोविड – 19 पासून मुक्त करणे आवश्यक आहे. असे म्हणत आभार मानले.
या आधाी ट्रम्प ट्वीटमध्ये म्हणाले, मित्र राष्ट्र असलेल्या भारताला अमेरिकेकडून व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आम्ही आहोत. मैत्रीपूर्ण संबंध असलेला भारत आणि अमेरिका मिळून कोरोना व्हायरसविरुद्ध लस विकसित करण्याचे काम करीत आहेत. एकमेकांना लागणारी मदत करत असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले आहे.