कल्याण : बहुजननामा ऑनलाईन – म्हाडा इमारतीतील (MHADA building) सोडतीत घोटाळ्याचा आरोप केल्याप्रकरणी मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांच्या विरोधात फौजदारी दावा दाखल करण्यात आल्याची माहिती अॅड. प्रदीप झेंडे यांनी दिली आहे. राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांच्या विरोधात कल्याण न्यायालयात (kalyan court) हा दावा दाखल करण्यात आला आहे, असे अॅड. झेंडे यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कल्याण मतदारसंघातील (kalyan constituency) मौजे खोणी येथे असलेल्या म्हाडा इमारतीच्या सोडतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला. तसेच याची चौकशी करावी अशी मागणी पाटील यांनी म्हाडाकडे केली होती. परंतु म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या सोडतीमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप झाला नसून मानवी हस्तक्षेप करण्यास वाव नसल्याचे सांगितले.
तसेच म्हाडाच्या वरिष्ठ लिपीक छाया राठोड (chhaya rathod) यांच्या नातेवाईकांनी सर्व अटी-नियमांची पूर्तता करुन सदनिकांचा ताबा घेतल्याचे चौकशीत स्पष्ट करत ही तक्रार निकाली काढली, असे अॅड. प्रदीप झेंडे यांनी सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांनी नाहक बदनामी केल्याचे सांगत कल्याण न्यायालयात त्यांच्याविरोधात फौजदारी दावा (Criminal claim) केल्याचे, अॅड. प्रदीप झेंडे (Adv. Pradeep Zende) यांनी सांगितले आहे.
Web Title : claim of defamation suit against mla raju patil for alleged misconduct in mhada draw
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Narayan Rane | नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात दाखल
Pune Metro | लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान मेट्रो शेडवर झाला गोळीबार, मेट्रोचा कर्मचारी जखमी
Corona 3rd Wave | तिसऱ्या लाटेचा मुंबई, पुण्याला सर्वाधिक धोका