अकोला : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाची सोमवारी जिल्हास्तरीय बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी करण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. याशिवाय 25 जुलैपासून जिल्ह्यात तालुका व जिल्हा परिषद सर्कलनिहाय दौऱ्यांचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाची ही बैठक शहरातील अशोक वाटिक सभागृहात पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी करण्यासंदर्भात यात मंथन करण्यात आले. ही बैठक भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत तालुका अध्यक्षांनी पक्षाच्या संघटनात्मक कामांचे अहवाल सादर केले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे यांनी आवाहन केले की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. याशिवाय याच बैठकीत, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकींच्या तयारीसाठी जिल्ह्यात पक्षाच्या वतीने 25 जुलैपासून तालुका व जिल्हा परिषद सर्कलनिहाय दौऱ्याचे नियोजनही करण्यात आले.
‘एकजुटीने काम करा’
यावेळी बोलताना माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले की, आगामी निवडणुकांच्या तयारीत पक्षाचे काम करताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पायात पाय घालून नाही तर हातात हात घालून एकजुटीने काम करावे. याशिवाय सर्कलनिहान पक्षाचे निरीक्षक नेमण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी, माजी आमदार हरिदास भदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सल्लागार हिरासिंग राठोड, ज्ञानेश्वर सुलताने, सैफुल्लाखान, दीपक गवई, शोभा शेळके, संध्या वाघोडे, जमीरउल्लखा पठाण, अशोक शिरसाट, बालमुकुंद भिरड, शंकरराव इंगळे, गजानन गवई, गौतम शिरसाट, सुभाष रौंदळे, प्रतिभा अवचार, डॉ. अशोक गाडगे, गजानन दांडगे, सरेश शिरसाट, मंगला शिरसाट, प्रा. सुरेश पाटकर, मंगला इंगळे, विद्या अंभोरे, सुषमा कावरे, कोकिळा वाहुरवाघ, अनघा ठाकरे, प्रा. मंतोष मोहोळ, योगिता वानखडे, अंजली देशमुख, सम्राट सुरवाडे, विकास सदाशिव, सम्राट तायडे, गोपाल कोल्हे, हरिभाऊ वाघोडे यांच्यासह भारिप बहुजन महासंघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.