मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वांद्रे येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कौटुंबिक दिली आहे. मुंबईतील वांद्रे भागात असणार्या गुरु नानक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रुग्णालयात त्यांनी कोविड 19 ची चाचणीही करण्यात आली. मात्र या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कदाचित त्यांना येत्या दोन दिवसात डिस्चार्जही मिळू शकतो असेही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या नृत्य दिग्दर्शिका आहेत. डिंग डाँग डिंग.. हे गाणे असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचेही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे. 2019 मध्ये आलेल्या कलंक या सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफीही त्यांनी केली आहे. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.