मुंबई बहुजननामा ऑनलाईन – मी गद्दार नाही. मी कुठेही पळून गेलेली नाही. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडला. पतीच्या चौकशीचा आणि भाजपा प्रवेशाचा काही संबंध नाही. असं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं. भाजप प्रवेशानंतर त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
मी राष्ट्रवादीत असताना ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला. त्या ठिकाणी मी आवाज उठवला आहे. सरकारविरोधात अनेक आंदोलनं केली. मोर्चे काढले. माझ्यावर अनेक गुन्हेही दाखल झाले. भाजप सत्ताधारी पक्ष आहे. म्हणूनच मी भाजपमध्ये आहे. लोकांची भूमिका मांडण्याऐवजी आता त्या सोडवून दाखवेन. मी गद्दार नाही, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडला आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्या पतीला वाचविण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याची चर्चा रंगली होती. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पतीच्या चौकशीचा आणि माझ्या भाजप प्रवेशाचा काहीही संबंध नाही. असं त्या म्हणाल्या.