मुंबई : भांडुप पोलिस ठाण्यातील खबरी गुन्हेगार आयान खानचा बर्थडे सेलिब्रेट करणं ५ पोलिसांना चांगलच महागात पडलं आहे. पोलिस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेट करणार्या 2 पोलिस उपनिरीक्षकांसह 3 पोलिस कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबीत केलं आहे.
आयान खान हा पोलिसांचा खबरी असून त्याच्याविरूध्द गुन्हे दाखल आहेत. दि. २३ जुलै रोजी त्याचा वाढदिवस होता. भांडुप पोलिस ठाण्यातील ५ जणांनी त्याचा पोलिस ठाण्याच्या इमारतीतील एका कक्षात वाढदिवस साजरा केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. काही अधिकार्यांनी आयान खानला केक भरवला होता. पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याने २ पोलिस उपनिरीक्षकांसह ३ पोलिस कर्मचार्यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.
यामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. भांडुप पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सचिन कोकरे, उपनिरीक्षक पंकज शेवाळे, पोलिस हवालदार घोसाळकर, पोलिस कर्मचारी गायकवाड आणि जुमले अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत.