बहुजननामा ऑनलाईन – पासपोर्ट मिळविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात हे मिळविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यांना लवकर पासपोर्ट हवे आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आता व्यक्तींना पोसपोर्ट तयार करताना अर्जदाराला फोटो, पत्ता आणि स्वाक्षरीच्या तपासणीसाठी पोलिस ठाण्यात जावे लागणार नाही कारण या तीन नियमांना पोलीस पडताळणी फॉर्मेटमधून काढून टाकले आहे. या फॉर्मेटमध्ये ९ नियमांचा समावेश होता त्यापैकी तीन काढण्यात आले आहे. आता यापैकी सहा नियम राहिले आहे.
क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी सी.एल. गौतम यांनी सांगितले की, काढून टाकलेल्या तीन नियमांची पडताळणी पासपोर्ट कार्यालयातर्फे करण्यात येते. त्यामुळे पोलिसांतर्फे करण्यात येणाऱ्या तीन नियमांची अनिवार्यता बंद करण्यात आली आहे. पण विशेष आणि संदिग्ध स्थितीत पोलीस कार्यालयीन अहवालात आपला पडताळणी अहवाल सहभागी करु शकतात. या तीन पैलूची अनिवार्यता बंद केल्यामुळे अर्जदाराला पोलिसांकडे किंवा पोलिसांना अर्जदारांच्या घरा जावे लागणार नाही.
केंद्रात अर्जदारांच्या संख्येत घट
सादिकाबाद येथील पासपोर्ट सेवा केंद्रात (पीएसके) अर्जदारांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. दीड वर्षांपुर्वी दररोज जवळपास ७०० अर्ज येत होते पण ही संख्या आता कमी झाले आहे आणि ३५० वर आली आहे. विदर्भातील १० जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाल्यामुळे अर्जदार कमी झाले आहे. अकोला आणि अमरावती येथे दररोज प्रत्येकी ५० अर्जाऐवजी मर्यादा २५० अर्जापर्यंत वाढविण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील पीएसकेमध्ये अर्जाच्या संख्येत आणि घट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पोस्ट ऑफिसला देण्यात येणार लीज लाईन
विदर्भातील पासपोर्ट देण्याऱ्या ऑफिसला बीएसएनची लीज लाईन देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जावर वेगाने प्रक्रिया होणार आहे. सध्या अनेक पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात फोटो योग्यरित्या स्कॅन होत नाही तर कुठे फाईलचा शोध लागत नाही. अशावेळी अर्जदाराला नागपुरात यावे लागते. त्यात त्यांचा वेळही जातो आणि पैसा ही. या लीजलाईनमुळे अर्जदारांना नागपुरातील सेवा केंद्रात यावे लागणार नाही. पण आवश्यक चौकशीसाठी त्यांना पासपोर्ट कार्यालयात यावे लागणार आहे.
विदर्भात सध्या पोस्ट ऑफिसमध्ये बीएसएनएलच्या ब्रॉडब्रॅण्ड कनेक्शनने काम होत आहे. यामुळे अनेकदा फोटो आणि कागदपत्रांच्या स्कॅनिंगमध्ये अडचण येत आहे. या कामासाठी चार ते पाच दिवस लागतात. त्यानंतर फाईल तयार झाल्यानंतर नागपुरात पाठविण्यासाठी आणखी दोन दिवस लागतात. अशाप्रकारे पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ग्रॅन्टिंग होईपर्यंत जवळपास आठ दिवसांचा कालावधी लागतो.
अर्जदारांना लवकर पासपोर्ट मिळावा यासाठी सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. पण ऑनलाईन कामाची गती कमी असल्यामुळे अर्जदारांना अनेक दिवस पाहत पहावी लागत आहे. विदर्भात अकोला, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, वर्धा, गोंदिया, भंडारा, बुलडाणा येथे पोस्ट ऑफिस सेवा केंद्र सुरू आहेत. यातील गोंदिया आणि भंडारा येथे एकाच जिल्ह्याच्या स्वरुपात एक पीओपीएएस देण्यात आले आहेत.