Chitra Wagh | ‘उद्धवजी तुम्ही मर्यादा ओलांडल्या, तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार’, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. जर फडणवीसांच्या कुटुंबावर बोलावं लागलं, तर त्यांना शवासन कराव लागेल, असं ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावरुन भाजप(BJP) आक्रमक झाला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेद्रजींच्या नादी लागू नका, असं म्हणत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धवजी, कमरेखालचे वार करून तुम्ही सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत
जे बोललाय ते ही आरोपपत्राचा भाग आहे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे तरी ही तुम्ही शितोंडे उडवण्याचा प्रयत्न केलातप्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाणा-या तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार आहे. म्हणूनच तुमची… https://t.co/D1c1AMY7Hm
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 24, 2023
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत ट्विट केलं आहे. उद्धवजी, कमरेखालचे वार करून तुम्ही सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. जे बोललाय ते ही आरोपपत्राचा भाग आहे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे तरी ही तुम्ही शितोंडे उडवण्याचा प्रयत्न केलात. प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार आहे. म्हणूनच तुमची तंतरलीय.
उद्धवजी शवासन शिकून घ्या
उद्धव ठाकरे, तुम्ही नक्कीच आत्मचरित्र लिहायला हवं… त्यात खालील घोटाळे कसे केले त्यावरही लिहा… म्हणजे मराठी माणसाला तुम्ही कसं लुटलं ते ही कळेल…आणि हो, लवकरच ज्या आसनाची गरज तुम्हाला लागणार आहे ते शवासन ही शिकून घ्या उद्धवजी…अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता है.. हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलयं जे तुम्ही आणि तुमच्या बगलबच्च्यांनी पाहील आहेचं.. म्हणून सांगतोय आमच्या देवेंद्रजींच्या नादी लागू नका, असं चित्री वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Web Title : Chitra Wagh | bjp chitra wagh slams uddhav thackeray over devendra fadnavis statement
- Pune PMC employees Transfers | पुणे महापालिकेतील 51 अधिक्षक, उपअधिक्षक आणि लिपिकांची बदली
- No Water Cut In Pune On Thursday | आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिमित्त पुण्यात गुरूवारी नियमित पाणीपुरवठा
- ACB Trap On PSI News | 1 लाख दिले तर गुन्हा B फायनल करतो, अन्यथा फसवणूकीच्या गुन्ह्यात आरोपी करतो; पीएसआय अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Comments are closed.