पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune PMC employees Transfers | महापालिकेतील Pune Municipal Corporation (PMC) वर्षानुवर्षे एकाच विभागात असलेल्या अधिक्षक, उपअधिक्षक आणि लिपिकांची (Transfers Of PMC Superintendent, Deputy Superintendent and Clerk) अन्य विभागांत बदली करण्यात आली आहे. विशेष असे की यापैकी काहींची मागील महिन्यांतच बदली करण्यात आली होती. बदली झालेल्यांमध्ये ८ अधीक्षक, २१ उपअधीक्षक आणि २२ लिपिक, टंकलेखकांचा समावेश आहे. (Pune PMC employees Transfers)
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये चार वर्षांहून अधिक काळ काम करणार्या कर्मचार्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाने केल्या होत्या. प्रामुख्याने कनिष्ठ अभियंते, अधीक्षक, उपअधीक्षक आणि लिपिकांकडून ही अडवणूक होत असल्याचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मागील दोन अडीच महिन्यांत विविध विभागात काम करणार्या कर्मचार्यांची सेवा ज्येष्ठता तपासून चार वर्षाहून अधिक एकाच विभागात काम करणार्यांची यादी करून बदल्यांचे आदेश काढले. हे आदेश काढताना प्रत्येक खात्यात २० टक्के अनुभवी कर्मचारी राहातील, याची दक्षता घेण्यात आली होती.
दरम्यान, प्रशासनाने काल अधीक्षक, उपअधीक्षक आणि लिपिक टंकलेखक पदावरील ५१ जणांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. परंतू यामध्ये अवघ्या दोन महिन्यांपुर्वी बदली झालेल्या काही कर्मचार्यांचाही समावेश आहे.
Web Title : Pune PMC employees Transfers | Transfer of 51 Superintendents, Deputy Superintendents and Clerks in Pune Municipal Corporation
- No Water Cut In Pune On Thursday | आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिमित्त पुण्यात गुरूवारी नियमित पाणीपुरवठा
- ACB Trap On PSI News | 1 लाख दिले तर गुन्हा B फायनल करतो, अन्यथा फसवणूकीच्या गुन्ह्यात आरोपी करतो; पीएसआय अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Pune ACB Demand Case | पुण्यातील महावितरणची महिला सहाय्यक अभियंता अॅन्टी करप्शनच्या रडारवर, 12 हजाराच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल