पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडा कारागृहामध्ये (Yerawada Jail) कैद्यांमध्ये हाणामारी (Beating) होण्याच्या घटना घडत आहेत. कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये (Prisoners) हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार कैद्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News) वर्चस्वाच्या वादातून कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.
या प्रकरणी प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे, तेजस बाळासाहेब बच्छाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह रक्षक कृष्णा वानोळे (Jail Guard Krishna Vanole) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा कारगृहातील सीजे विभागात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आरोपी आणि सुजीत टाक यांच्यात वाद झाला. यावरुन आरोपींनी टाक याला शिवीगाळ करुन त्याला प्लास्टिकच्या बादलीने मारहाण केली. या घटनेत सुजीत टाक जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे (PSI Ashok Kate) करीत आहेत.
येरवडा कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. कारगृहाची क्षमता अडीच हजार असताना सध्या याठिकणी सात हजार कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने वर्चस्व वादातून कैद्यामध्ये हाणामारीच्या घटना सतत घडतात. नुकतीच अशा प्रकारची घटना कारागृहात घडली होती. याप्रकरणी 16 कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Web Title : Pune Crime News | Yerwada prison inmates clash again, FIR against four prisoners
- Chitra Wagh | ‘उद्धवजी तुम्ही मर्यादा ओलांडल्या, तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार’, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Pune PMC employees Transfers | पुणे महापालिकेतील 51 अधिक्षक, उपअधिक्षक आणि लिपिकांची बदली
- No Water Cut In Pune On Thursday | आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिमित्त पुण्यात गुरूवारी नियमित पाणीपुरवठा
- ACB Trap On PSI News | 1 लाख दिले तर गुन्हा B फायनल करतो, अन्यथा फसवणूकीच्या गुन्ह्यात आरोपी करतो; पीएसआय अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात