बहुजननामा ऑनलाइन टीम – चेन्नईच्या एका व्यावसायिकाने भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला 4 कोटीचा चुना लावलाय. हरभजन सिंगने या व्यावसियाकाला 4 कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं. पण, आता हा व्यावसायिक त्याला पैसे परत करत नाही. त्यामुळे हरभजन सिंगने चेन्नई सिटी पोलिसात तक्रार दाखल केलीय.
एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, एका मित्राच्या माध्यमातून याअगोदर हरभजन सिंग हा जी. गणेश या व्यावसायिकाला भेटला. त्यानंतर हरभजन सिंगने या व्यावसायिकाला 2015 साली 4 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर हरभजनने या व्यावसायिकाकडे पैसे परत मागगितले. तसेच हरभजन सिंगने या व्यावसायिकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने हरभजनला काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हरभजन सिंगने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
मागील महिन्यात महेश या व्यावसायिकाने हरभजन सिंगला 25 लाख रुपयांचा धनादेश दिला होता. पण, या व्यावसायिकाच्या खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे हा धनादेश/चेक बाऊन्स झाला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी हरभजन चेन्नईला गेला आणि त्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केलीय. त्यानंतर पोलिसांनी या व्यावसायिकाला समन्सही बजावले.
महेश या व्यावसायिकाने आता एक प्रतिज्ञापत्र सादर केले. यात आपण हरभजन सिंगकडून कर्ज घेतले आहे. त्यासाठी एक प्रॉपर्टी तारण म्हणूनही ठेवलेलीय. पण, मी हरभजन सिंगचे सर्व पैसे परत करेन, असे या व्यावसायिकाने प्रतिज्ञापत्रात म्हंटलंय.