नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओकिनावाने भारतात R30 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहे. भारतात ही स्कूटर 58 हजार 992 रुपयांच्या किंमतीत लाँच केली आहे. कंपनीने या स्कूटरची बुकिंग देखील सुरु केली आहे. ही स्कूटर बुक करण्यासाठी तुम्हाला केवळ 2 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येवू शकते. हे एक लो-स्पीड सेगमेंटची स्कूटर आहे. जे 25KMPH च्या टॉप स्पीड सोबत येते. स्कूटरमध्ये 1.25kWh ची लिथीयम आयन बॅटरी देण्यात आली आहे.
60 किमीची रेंज
स्कूटरमध्ये वापरण्यात आलेली बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर 60 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. याला चार्ज करण्यासाठी 4 ते 5 तास वेळ लागतो. ही स्कूटर मायक्रो चार्जरसोबत येते. ऑटो कट फंक्शन सोबत येते. स्कूटरची बॅटरी 3 वर्षापर्यंत वॉरंटीसोबत येते तर 250 वॉट BLDC मोटरवर 30 हजार किमीपर्यंत 3 वर्षांची वॉरंटी मिळते.
एका किमीसाठी 1.5 रुपये खर्च
स्कूटरची बॅटरी चार्ज करण्यासाठी 1 तासाला 1 युनिट खर्च होतो. म्हणजेच पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 युनिट वीज लागणार आहे. जर एका युनिटचा खर्च 7 ते 8 रुपये असेल तर 5 युनिटसाठी 40 रुपये खर्च होणार आहेत. म्हणजेच 40 रुपयांच्या खर्चात तुम्ही 60 किमी जाऊ शकणार आहेत. हिशोब पाहिल्यास एका किमीसाठी 1.5 रुपये खर्च होणार आहेत.
5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध
ही स्कूटर 5 कल ऑप्शनसोबत येते. ही स्कूटर ग्लॉसी रेड, मेटेलिक ऑरेंज, सनराईज यलो, पर्ल व्हाईट आणि सी ग्रीन सोबत खरेदी करता येऊ शकते. स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स दिले आहेत. रियरमध्ये ट्विन शॉक अब्जॉर्वर्स देण्यात आले आहेत. स्कूटरला दोन्ही व्हील्ज ड्रम ब्रेक्स सोबत येते.