Narayan Rane On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणे यांनी थेट दिला इशारा, आत जाल…

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Narayan Rane On Uddhav Thackeray | गोरेगावमधील गट प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते (BJP Leader) आणि शिंदे गटावर (Shinde Group) सडकून टीका केली होती. यानंतर भाजपा नेते एका पाठोपाठ एक उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. आता तर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Narayan Rane On Uddhav Thackeray) यांना थेट ईडीचीच (ED) धमकी दिली आहे. तसेच टीका कराल तर संजय राऊतांच्या (Sanjay Raut) सोबतीला आत जाल, असा थेट इशारा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर सभेत केलेल्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. लबाड लांडगा. यांच्यासारखा खोटारडा माणूस नाही. उद्धव ठाकरेंनी किती मराठी लोकांना रोजगार दिला. काल जे काही बोलले आहेत, खोका, गिधाडं आत जाल. संजय राऊतांची सोबत करायला. खोक्याची चौकशी होणार आहे, यांच्या मागे ईडी लागणार आहे. (Narayan Rane On Uddhav Thackeray)
नारायण राणे म्हणाले, मला भाजपात घेऊ नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शहांना (Amit Shah) कालपर्यंत फोन करत होते. त्याच अमित शहांवर तुम्ही गिधाडं वगैरे टीका करता. चांगले बोलता येत नाही काय? बाप पळविणार्या औलादीचे भाष्य करताय, बापाची ध्येय धोरणं न ठेवणारा हा माणूस. बाळासाहेबांची एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), आमदार आठवण काढतात, त्याला चोरी कसे काय म्हणू शकता. साहेब असे नव्हते, ते मोठ्यांचा आदर करायचे. उद्धव ठाकरे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही.
उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना राणे म्हणाले, यांनी पदासाठी आणि पैशांसाठी आणि खोक्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली. अमित शहा मुंबईवर चालून आले असे म्हणता, देशाचा गृहमंत्री मुंबईत आला तर मुंबई तुमची आहे का? कलानगरला टक्केवारीसाठी ऑफिस उघडले. पालिकेच्या टेंडरमागे 15 टक्के घेत होते. आता आम्हाला ठेकेदारांनाच समोर आणावे लागेल. (Narayan Rane On Uddhav Thackeray)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राणे पुढे म्हणाले, मुंबईवर संकट येते तेव्हा केंद्र सरकार (Central Government) नेहमी महाराष्ट्राला (Maharashtra) मदत करते. अशी एकही नैसर्गिक आपत्ती नाही, तिकडून मदत येत नाही.
हे कधी वाचतच नाहीत. मातृभूमीसाठी काय केलेत तुम्ही, मुंबईच्या भूमीवर राहणार्या लोकांसाठी काय केले.
मुंबईत दोन लाख भिकारी आहेत. काय केलेत यांच्यासाठी, मातोश्रीच्या आजुबाजुलाच पाच-सहा हजार भिकारी आहेत.
राणे म्हणाले, भावना गवळींच्या (Bhavna Gawli) वडिलांनी आयुष्य शिवसेनेसाठी घालवले.
भावना गवळी तर लहान असल्यापासून खासदार आहेत. त्यांच्यावर मोदींना राखी बांधण्यावरून टीका केली.
तुम्हाला राखी बांधण्याचे काय महत्व असणार. ज्या महिलेने शिवसैनिकांचे नेतृत्व केले, एवढी वर्षे तिने पक्षाची सेवा
केली, तिच्याविरोधात असे बोलतात.
उद्धव ठाकरे यांना इशारा देताना राणे म्हणाले, मोदींच्या कामासमोर तुम्ही नखाएवढे पण नाही.
बावनकुळे की एकशेबावनकुळे कळेल कसे, कधी शाळेत गेलातच नाही.
यापुढे वाकड्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्रात फिरू शकणार नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrashekhar Bawankule | my family is my responsibility uddhav thackeray sees no one buthis family chandrasekhar bawankule
हे देखील वाचा :
IND vs AUS | भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या तिकीट खरेदीसाठी रांग ! चाहत्यांवर लाठीचार्ज
Comments are closed.