आता जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणार ‘तात्काळ’, लवकरच 7 ठिकाणी नवीन कार्यालये

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- आता जात पडताळणी प्रमाणपत्र जलदगतीने मिळणार आहे. कारण राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जात पडताळणीची प्रक्रिया अधिक गतीमान होण्यासाठी अनेक ठिकाणी समिती कार्यालये स्थापन करण्यासाठी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यात पालघर, धुळे, किनवट, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर अशा सात ठिकाणांचा समावेश आहे.
ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि गडचिरोली या 8 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना होणार आहे. आता नव्याने मान्यता मिळालेल्या 7 ठिकाणांसाठी समित्यांसाठी आवश्यक असणारा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग निर्माण करण्यात येणार आहे. यामळे आता विद्यार्थी तसेच इतर अर्जदारांना वेळेत प्रमाणपत्र मिळतील.
आदिवासी आश्रमशाळांसाठी अतिरीक्त विज्ञान शिक्षक
राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत राज्यातील आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरीक्त पदे निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यासाआठी एकूण 254 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. यात 111 शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 111 पदे आणि 143 अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 143 पदांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे नियमानुसार प्रशिक्षित पात्रताधारक उमेदवारांमधून आणि शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनेच उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
Comments are closed.