बहुजननामा ऑनलाईन- वॉलमार्टच्या मालकीची देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने मंगळवारी (ता.३) हिंदी भाषेतून आपल्या सेवांची घोषणा केली. यामुळे देशभरातील अनेक ग्राहकांना त्यांच्या मातृभाषेतून व्यवहार करता येणार आहेत. कंपनीने हिंदी भाषेतून सेवा दिल्यास दोन दशलक्ष अतिरीक्त ग्राहक जोडण्यास मदत होणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.
उत्सवाच्या काळातील विक्री लक्षात घेऊन हिंदी भाषेतून व्यवहार सुरू केल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयंद्रन वेणुगोपाल म्हणाले, उद्योगाशी संबंधित निरीक्षणातून असे दिसून आले आहे की, भारतातील ९० टक्के लोक इंटरनेट वापरासाठी मातृभाषेचा वापर करतात.
मातृभोषेत खरेदी विक्रीची सेवा उपलब्ध झाल्यामुळे फ्लिपकार्टच्या ग्राहकांना त्यांना हवी असणारी उत्पादनांची माहिती हिंदीतून मिळणार आहे. तसेच २०२१ पर्यंत इंग्रजी भाषेतून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांपेक्षा हिंदी भाषेतील ग्राहकांची संख्या जास्त असेल. ग्राहकांच्या सोयी समजून घेण्यासाठी, त्यांचा संदर्भ समजून घेत त्यांच्यासाठी मातृभाषाषेतून व्यवहाराची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.