मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- जम्मू-काश्मीरमधून विशेष दर्जा हटविल्यापासून (कलम ३७०) पाकिस्तान भारताविरुद्ध अपशब्द वापरत आहे. काश्मीरबद्दल बनावट बातम्यांचा प्रसार करणे, भारताला युद्धाची धमकी देणे हा सध्याच्या पाकिस्तानच्या नित्यकर्माचा एक भाग बनला आहे. आजकाल पाकिस्तानला काश्मीरशिवाय दुसरं काहीचं सुचत नाहीये. त्यानंतरच इम्रानचे मंत्री असो वा तिथले कलाकार आणि गायक, ते काश्मिरबरोबर भारताला देखील धमकावू लागतात.
धमक्या देखील अशा आहेत की जे ऐकून केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग हास्यास्पद होऊ शकेल. या यादीत आता एक नवीन नाव समोर आले आहे पाकिस्तानी सिंगर राबी पीरजादा. राबी पीरजादाने काश्मीरसोबतच भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकावले.
ایک کشمیری لڑکی کی تیاری مودی کے خلاف، ویسے تو اس نے جہنم میں جانا ہی ہے، مگر اس جیسے انسا ن کی دنیا بھی جہنم ہونی چاہیے۔ #chotisibaathttps://t.co/cGfxSd0hd5 pic.twitter.com/h3C9HA1BT0
— Rabi Pirzada (@Rabipirzada) September 2, 2019
राबी पीरजादाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्या व्हिडीओमध्ये ती खतरनाक साप आणि मगर यांच्यामध्ये दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये राबी पीरजादा म्हणाली आहे की एक काश्मिरी मुलगी आपल्या सापांसह सज्ज आहे. भारत तुमच्यासाठी आहे. हे साप मोदींना भेटवस्तू देण्यासाठी आहेत.
आता मरण्यासाठी सज्ज व्हा. यानंतर, राबी पीरजादा काश्मीरवर आवाज उठवण्यासाठी एक गाणं गाते आहे. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा राबी पीरजादा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध असे शब्द वापरत आहेत. राबी यांनी पीएम मोदी आणि भारतीय सैन्यासाठी अनेक वेळा अपशब्द वापरले आहेत.