पुणे : बहुजननामा ऑनलाईन – या आहेत माधुरी कानिटकर. ज्यांनी सुमारे 3 महिन्यांपूर्वी मेजर जनरलवरून लेफ्टिनेंट जनरल पदावर प्रमोशन मिळवले आहे. या लष्करातील अशा तिसर्या महिल्या आहेत, ज्या या पदावर पोहचल्या आहेत. त्या सध्या नवी दिल्लीत डेप्युटी चीफ, इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ (डीसीआयडीएस) आणि मेडिकल (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अंतर्गत) ची जबाबदारी सांभाळत आहेत.
यापूर्वी या पोस्टवर सर्वात आधी नौदलाच्या व्हाईस अॅडमिरल डॉ. पुनीता अरोड़ा आणि त्यानंतर हवाई दलाच्याच एयर मार्शल पद्मावती बंदोपाध्याय पोहचल्या होत्या. माधुरी कानिटकर सशस्त्र दलाच्या पहिल्या बालरोग तज्ज्ञ आहेत, ज्यांनी इतकी मोठी जबाबदारी सांभाळली आहे. लष्करातील हे दुसरे मोठे पद आहे. माधुरी कानिटकर यांनी 37 वर्षात भारतीय लष्कराचा अभिमान वाढवला आहे.
भारताच्या इतिहासत हा पहिला क्षण आहे, जेव्हा एखादे दाम्पत्य या पदापर्यंत पोहचले आहे. माधुरी कानिटकर यांचे पती राजीव कानिटकर सुद्धा लेफ्टनंट जनरल होते. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. माधुरी कानिटकर यांना मागच्या वर्षी लेफ्टनंट जनरल पदासाठी निवडण्यात आले होते. तेव्हा हे पद रिक्त नव्हते, यासाठी त्यांना वाट पाहावी लागली. माधुरी कानिटकर सध्या नवी दिल्ली येथील लष्कराच्या मुख्यालयात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अंतर्गत कार्यरत आहेत. सीडीएस एक असे पद आहे, जे लष्कराच्या तिन्ही दलांशी संबंधीत प्रकरणांवर आपला सल्ला देऊ शकते. म्हणजे हे पद तिन्ही दलांसाठी सेतू आहे.
काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महिला अधिकार्यांना सशस्त्र दलात स्थायी कमीशन देण्याचे निर्देश दिले आहेत. माधुरी कानिटकर या यापूर्वी मेजर जनरल पदावर पुण्याच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) च्या डीन होत्या. पेडियाट्रीक अॅण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रीक नेफ्रोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट माधुरी कानिटकर यांनी ग्रॅज्युएशन एआयआयएमएस केले आहे. त्यांनी अनेक सुवर्ण पदके मिळवली आहेत. माधुरी कानिटकर यांनी पुणे आणि दिल्लीत मुलांच्या किडनीशी संबंधीत आजारांची तपासणी करणार्या युनिटची स्थापना केली होती.