बहुजननामा ऑनलाइन टीम – भररस्त्यात कार चालकाने(Car driver ) दुचाकीस्वार तरुणीशी वाद घालत तिला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉर्न (Car driver )वाजविलेला ऐकू येत नाही का, यावरून हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ८ ऑक्टोंबरला हांडेवाडी रस्त्याने दुचाकीवरून जात होती. त्यावेळी पाठीमागून कार चालक आला. त्याने तरुणीला त्यांना थांबविले. तसेच तुला हॉर्न वाजविलेला कळत नाही का, असे बोलून शिवीगाळ केली. त्यावेळी तरुणीने काय झाले अशी विचारणा केल्यानंतर आरोपी कारमधून खाली उतरला आणि तरुणीचे डोके दुचाकीच्या हँडलवर आपटले. त्यानंतर तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला. घटनेनंतर तरुणी खूप घाबरली होती. तिने कुटुंबायाकडे गेली. त्यानंतर पोलिसांकडे येऊन तक्रार दिली. अधिक तपास वानवडी पोलिस करत आहेत.