नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एप्रिलपासून नवे शैक्षणिक पर्व सुरु होणार असून शाळेची संबंधित बिजनेस करायची हीच संधी आहे. तुम्ही स्कुलबॅग बनवण्याचा बिजनेस सुरु करू शकता. जर तुमचे युनिट प्रोडक्शन सुरु झाले तर तुम्ही तीन महिन्यांत चांगली कमाई करू शकता. या बिजनेसबाबत वैशिष्ट्य म्हणजे सरकार पंतप्रधान मुद्रा स्कीम अंतर्गत तुम्हला या व्यायसायासाठी कर्जही देऊ शकते. पंतप्रधान एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम अंतर्गत तुम्ही लोन आणि अनुदानही घेऊ शकता.
एवढ्या पैशात सुरु होऊ शकतो बिजनेस-
नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन तर्फे तयार केल्या जाणाऱ्या प्रोजेक्टनुसार जर तुम्ही १४ हजार बॅग बनवण्याचे युनिट लावणार असाल तर मशीन व साहित्य, तीन महिन्यांसाठी कामाचे भांडवल, रॉ-मटेरियल, युटिलिटीज आणि पगारावर तब्बल ११.५५ लाख रु. गुंतवणूकीची गरज पडेल. तुम्ही या प्रोजेक्टच्या आधारावर लोन घेतले तर तुम्हाला भांडवल म्हणून १ लाख रु.चा व्यवस्था करावी लागेल. बाकीचे ९० टक्के तुम्हाला लोन मिळू शकते.
अहवालानुसार वर्षाला १५ हजार बॅग बनवण्याच्या युनिटसाठी तुम्हाला तब्बल १२० वर्ग मीटर जागा लागेल. ज्यात कमीत कमी १०० वर्ग मीटर कवर्ड होईल. विजेचा लोड २ किलोवॅटपासून ५ किलोवॅट पर्यंत लागेल. ज्यामुळे पाण्याचे नॉर्मल कनेक्शन होऊन जाईल.
या मशीन आणि रॉ-मटेरिअलची पडेल गरज-
स्कुलबॅग बनवण्यासाठी तुम्हाला एक सुई बेड, शिलाई मशीन, स्क्रीन प्रिंटिंग उपकरणे, साधने आणि कापड, नायलॉन स्ट्रॅप, डी-रिंग, झिप, रिव्हट्स, कॉटन टेप, बटन, लॉक, धागा, पॅकिंग सामग्रीची आवश्यकता असेल.
एवढी कमाई होईल-
जर स्कुलबॅगची सरासरी किंमत १०० रु. ठेवली तर १५ हजार बॅगची किंमत १५ लाख रु. इतकी होईल. त्यामुळे तुमची गुंतवणूक ११.५५ लाख रु. होईल. म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षी ३.५० लाख रु. कमावताल. ज्यात तुम्ही पुढच्या वर्षापासून मशीन आणि इन्स्टॉलेशनचा खर्च कमी होऊन तुमची कमाई आणखी वाढेल.