बहुजननामा ऑनलाइन टीम – भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 4) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खडका चौफुलीजवळ घडली ( died in an accident)आहे.
चंद्रकांत जगन्नाथ वराडे (वय 65) आणि संध्या वराडे (55, दोघेही रा. बुलढाणा) असे ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. वराडे दाम्पत्य नातेवाईकाच्या लग्नासाठी ते भुसावळात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.