बहुजननामा ऑनलाईन
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 574 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 493 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 81 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 65 व रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 368 तर रॅपिड टेस्टमधील 125 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 493 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
चिखली शहर : 12, चिखली तालुका : पेठ 1, भरोसा 2, शेलगाव देशमुख 1, मेरा बु 1, बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 7, साखळी बू 1, दुधा 3, मलकापूर शहर : 6, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : वडगाव माळी 1, डोणगाव 1, ब्रह्मपुरी 1, नायगाव दत्तापूर 1, खामगाव शहर : 1, दे राजा शहर : 3, दे राजा तालुका : शिवनी आरमाळ 1, पळसखेड चक्का 1, मेहुणा राजा 1, जळगाव जामोद शहर: 5, जळगाव जामोद तालुका: आसलगाव 1, पिंपळगाव माळी 1, जामोद 1, कुरणखेड 1, सिंदखेड राजा शहर: 2, सिंदखेड राजा तालुका: साखरखेर्डा 1, वाघजाई 1, मोताळा तालुका: अंतरी 1, सारोळा मारोती 1, लोणार तालुका : सरस्वती 3, मलकापूर डोळे 1, लोणार शहर: 1, नांदुरा तालुका काटी 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 81 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान घारोड ता. खामगाव येथील 80 वर्षीय पुरुष, हिंगणा ता खामगाव येथील 78 वर्षीय पुरुष व वाडी खामगाव येथील 76 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 159 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 23, खामगांव : 33, मेहकर : 1, शेगांव : 14, दे. राजा : 11, जळगांव जामोद : 3, सिं. राजा : 1, चिखली : 26, नांदुरा : 24, लोणार : 18, मलकापूर : 5
तसेच आजपर्यंत 32646 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 6813 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 6813 आहे.
आज रोजी 484 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 32646 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7849 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 6813 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 934 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 102 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.