नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात कर रचनेचे स्लॅब बदलणार असून त्यात एक पेच निर्माण झाला आहे. आता ५ ते १५ लाख रु. वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना खूप फायदा होईल, अशा बातम्या येत होत्या. तेव्हा ही कर रचना सरळ नसल्याचे स्पष्ट होत आहे. इनकम टॅक्सची नवीन स्लॅब स्वीकारायची की जुनी हा निर्णय सीतारामन यांनी करदात्यांवरच सोडला आहे. आपण कोणत्या रचनेप्रमाणे कर द्यायचा, याचा पर्याय कर देण्याऱ्याने ठरवायचा आहे.
नवीन स्लॅबमध्ये कोणतीही सूट किंवा डिडक्शन घेता येणार नसून नवीन स्लॅब घेतला तर ७० सवलती मिळणार नाही. पण या ७० सवलती काय आहेत, हे नेमके समजलेले नाही. आणि या ७० कर सवलतींवर पाणी सोडले तर नवीन टॅक्स स्लॅब लागू होणार आहे. तसेच या सवलती घ्यायच्या असतील तर जुन्या टॅक्स स्लॅब प्रमाणेच कर भरावा लागेल.
कुठलेही सूट किंवा कपातीशिवाय नवीन टॅक्स स्लॅब स्वीकारायचा कि उत्पन्नाच्या रकमेत सूट घेऊन जुन्याच टॅक्स स्लॅबप्रमाणे टॅक्स भरायचा याचा करदात्यालाच करावा लागणार आहे. तर नवीन रचनेप्रमाणे ५ लाख रु. पर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.
या आहेत इनकम टॅक्सच्या स्लॅब
- ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- ५ लाख ते ७.५ लाख उत्पन्न – १० टक्के इनकम टॅक्स
- ७.५ लाख ते १० लाख रु. उत्पन्न – १५ टक्के इनकम टॅक्स
- १० ते १२.५ लाख रु. उत्पन्न – २० टक्के इनकम टॅक्स
- १२.५ ते १५ लाख रु. उत्पन्न – २५ टक्के इनकम टॅक्स