बीड : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुद्द विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बीडमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी बीडमधील काही उमेदवारांची घोषणा केली. आज पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यात त्यांनी विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयार राहण्याचे कार्यकर्त्यांना आदेश देत शरद पवार म्हणाले, “मी तरुणांच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहे.” यावेळी त्यांनी 5 उमेदवारांची नावे जाहीर केली. पवारांनी यावेळी तरुणांना संधी दिली आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांच्यावर टीकाही केली.
पवारांनी जाहीर केलेले उमेदवार-
परळी- धनंजय मुंडे
गेवराई- विजयसिंह पंडित
केज- विमलताई मुंदडा यांच्या कार्याला पुढे नेणाऱ्या नमिता मुंदडा
बीड- संदीप क्षीरसागर
माजलगाव- प्रकाश सोळंके
अशी प्रकारे पवार यांनी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. जिल्ह्यातील एकमेक बाकी असलेल्या आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करू असंही पवार म्हणाले.
2014 मध्ये निवडून आलेले या 5 जागांवरील विद्यमान
केज- संगिता ठोंबरे(भाजप)
परळी- पंकजा मुंडे(भाजप)
गेवराई- लक्ष्मण पवार(भाजप)
माजलगाव- आर टी देशमुख(भाजप)
बीड- जयदत्त क्षीरसागर(राष्ट्रवादी- सध्या शिवसेना)
Visit : bahujannama.com