नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनवरून थायलंडला आणलेला महाकाय नर पांडा चुआंग चुआंग चे मंगळवारी वयाच्या १९ व्या वर्षी चियांग माई प्राणिसंग्रहालयात निधन झाले. चुआंग चुआंगला ऑक्टोबर २००३ मध्ये चीनमधून थायलंडमध्ये आणले गेले होते. येथे त्याला मादा पांडा लिन हूईबरोबर वातानुकूलित वाड्यात ठेवले होते. २००९ मध्ये लिन हुईची गर्भधारणा झाली, त्यानंतर थायलंडमध्ये पांड्यांची संख्याही वाढली.
मादा पांडाला गर्भधारणा करण्यासाठी चुआंग चुआंग हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. सन २०२३ मध्ये पुन्हा चुआंग चुआंगला चीनमध्ये परत नेण्याची योजना होती. चुआंग चुआंगच्या निधनानंतर लोकांनी ट्विटरवरुन आपली व्यथा व्यक्त केली.
Visit : bahujannama.com