नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हाय कोर्टाने प्रियकर आणि प्रेयसीमधील संबंधांवर एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. हाय कोर्टाने सांगितले की सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर प्रेयसीसोबत ब्रेकअप करणे कितीही खराब वाटले तरी हा अपराध नाही. न्यायालयाने सांगितले की शारीरिक संबंधांच्या सहमतीवर नाही चा अर्थ नाही होतो तसेच हा चा अर्थ हा होतो ही व्यापक संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन महिलेसोबत दुष्कर्म केलेल्या व्यक्तीच्या मुक्ततेचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला आहे.
न्यायालयाने याबाबतची अपील फेटाळून लावत पोलिसांना सांगितले की, आधीच्या कोर्टाने या व्यक्तीची मुक्तता करण्याचा निर्णय अगदी योग्य आहे. न्यायालयाने म्हंटले की प्रेयसीसोबत ब्रेकअप ही गोष्ट कितीही खराब वाटली तरी कायद्यानुसार हा अपराध नाही कारण दोन व्यक्ती परस्पर सहमतीने शारीरिक संबंध बनवत असतील तर हा गुन्हा नाही. हाय कोर्टाने सांगितले की, महिलेने लग्नाचे आमिष दाखवून केलेला आरोप हा केवळ तिने सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांचे समर्थन असन्या बरोबरच आपले वागणे बरोबर असल्याचेदेखील दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महिलेने वैद्यकीय तपासणीला देखील नकार दिला आहे.
न्यायमूर्ती विभु भाखरू यांनी सांगितले की, शारीरिक संबंधांसाठीच्या सहमतीचा प्रश्न आहे 1990 च्या दशकात सुरु झालेले अभियान नाही म्हणजे नाही याचा एक विशिष्ठ स्वीकृत नियम आहे. नाही हा एक स्पष्ट संकेत आहे की शारीरिक संबंधांसाठी स्पष्ट सहमती दिलेली नाही. त्यांनी सांगितले की संबंधांच्या सहमतीवर नाही चा अर्थ नाहीवरुन वाढून आता हो चा अर्थ हो हा एक व्यापक स्वीकृत पणा आहे. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत हा एक अपराध असेल. हाय कोर्टाने म्हंटल आहे कि तिची सहमती ऐच्छिक होती जि की लग्नाचे वचन मिळाल्यानंतर सहमतीने तीने शारीरिक संबंध ठेवले होते. तीन महिन्यांनी आरोपीने पहिले कृत्य केल्यानंतर महिला त्याच्यासोबत हॉटेलवर गेली होती त्यामुळे याला काही अर्थ नाही कि त्याला लग्नाचे काही आमिष दाखवण्यात आले होते.
Visit : bahujannama.com