बहुजननामा : ऑनलाईन टीम – सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुण रुग्णालयात एका बेडवर बसून हातात गिटार घेऊन गाणे गायन करीत आहे. अच्छा चलता हूं, दुआओं मे याद रखना हे गाणे त्याने गायले आहे. हे गाणे त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. हा तरुण आसामचा ऋषभ दत्ता आहे. गेल्या वर्षी त्याच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कित्येक जण त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत.बंगळुरूतील रुग्णालयात त्याचा 9 जुलैला मृत्यू झाला.
ऋषभ आता आपल्यात राहिला नाही मात्र त्याचा आवाज राहिला. त्याने रुग्णालयाच्या बेडवर असूनही गायलेले सुरेल आवाजातील गाण्याचा हा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. ऋषभ हा आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपोथरमध्ये राहणारा होता. दोन वर्षांपूर्वी त्या अप्लास्टिक अॅनिमिया हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले.
अनेक रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. मात्र तो बरा झाला नाही. अखेर तो आयुष्याचा लढा हरला. मात्र त्याचे व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होऊ लागलेत.ऋषभने रुग्णालयात गिटार वाजवत रणबीर कपूरच्या ए दिल है मुश्किलमधील चन्ना मेरेया, जवानी दिवानी तील कबीरा गाणंही गायले होते. त्याचा आवाज ऐकण्यासाठी त्याच्या आजूबाजूला नर्स आणि आरोग्य कर्मचारीही असल्याचे दिसत आहे.