बहुजननामा : ऑनलाईन टीम – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन बारावीच्या परीक्षेत लखनऊच्या दिव्यांशी जैनने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. काल बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्यामध्ये दिव्यांशी हिला 600 पैकी 600 मार्क मिळाले आहेत. अर्थात तिला प्रत्येक विषयात पूर्ण मार्क मिळाले आहेत. दिव्यांशी जैन लखनऊच्या नवयुग रेडियन्स पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे.
दिव्यांशीने इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, इन्शोरेन्स आणि अर्थशास्त्र विषयात 100 पैकी 100 मिळवले आहे. तिने हायस्कूलमध्येही 97.6 टक्के गुण मिळाले आहेत. दिव्यांशीच्या निकालानंतर तिच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. तर शाळेत शिक्षकांचे अभिनंदन करणार्यांसाठी मोठी वर्दळ लागली आहे. दिव्यांशी तिच्या यशाबद्दल सांगते की, मला 100 टक्के गुण मिळण्याची अपेक्षा नव्हती.
आता दिल्ली विद्यापीठातून बीए (ऑनर्स) शिकायचे आहे. खास गोष्ट म्हणजे दिव्यांशी हिने कोचिंगशिवाय हे यश मिळवले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) 12 वीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यावेळी एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 88.78 टक्के आहे. यंदाच्या सीबीएसई इयत्ता 12 च्या परीक्षेत 92.15 टक्के विद्यार्थीनी आणि 86.19 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.