बहुजननामा ऑनलाईन टीम – अनेकवेळा खेळाच्या मैदानात अपघात झाल्याची अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अनेकदा हे अपघात जीवघेणेही असतात. अशावेळी खेळाडू मैदानातच निरोप घेतात. असाच एक प्रकार व्यावसायिक बॉक्सिंग रिंगमध्ये घडला आहे.
बॉक्सिंगदरम्यान बुल्गारियामध्ये दुखापत झाल्याने एका बॉक्सरला मैदानातच प्राण गमवावा लागला. या खेळाडूच्या मृत्यूनंतर एक वेगळाच खुलासा झाला आहे. ज्या बॉक्सर खेळाडूचा मृत्यू झाला असे समजले जात होते तो खेळाडू तर जिवंत होता आणि मैदानातच मृत्यू झाला तो त्याच्या लायसन्सवर खेळणारा त्याचा भाऊ असल्याचे समोर आले. या घटनेमुळे व्यावसायिक बॉक्सिंगचे आयोजन करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
https://twitter.com/RichardSpilotro/status/1175853790668447744
बोरिस नावाच्या बॉक्सरचा व्यवसायिक बॉक्सिंग दरम्यान मृत्यू झाला. बोरीसच्या मृत्यू नंतर त्याच्या भावाने खुलासा केला बोरिस हा गेल्या एक वर्षांपासून त्याच्या भावाच्या लायसन्सवर स्पर्धेत भाग घेत आहे. बोरिसच्या भावाचे नाव इस्स होते. विशेष म्हणजे इस्सच्या नावाने बोरिस खेळत होता आणि त्याच्या मृत्यूनंतर वर्ल्ड बॉक्सिंग काऊन्सिलने २१ वर्षीय इस्सच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. यानंतर इस्स याने स्वतः हा फेसबुकवर पोस्ट लिहून याबाबत खुलासा केला.
Visit : bahujannama.com