नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अँटिग्वा आणि बर्म्यूडाचे पंतप्रधान गास्टन ब्राऊन यांनी पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचे प्रमुख आरोपी मेहूल चोक्सी याला मोठा धक्का दिला आहे. पंतप्रधानानी त्याला धोखेबाज म्हंटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला आलेल्या गास्टन यांनी म्हंटले की, चोक्सी याच्या घोटाळ्याविषयी योग्य ती माहिती घेतली आहे. या कार्यक्रमात चोक्सी विषयी बोलताना ते म्हणाले की, मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे असून तो एक घोटाळेबाज आहे. सध्या त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकरणात सध्या आम्हीही काहीही करू शकत नाही. मात्र आम्ही त्याला आमच्या देशात ठेऊ इच्छित नाही.
https://twitter.com/ANI/status/117696887813352652
‘भारतीय अधिकारी चोक्सी यांची हवी तेव्हा चौकशी करू शकतात’
अँटिगामध्ये चोक्सी यांची चौकशी करण्यास आपण भारतीय अधिकाऱ्यांना परवानगी देणार का असे विचारले असता, गॅस्टन म्हणाले की, त्यांचा कोणताही आक्षेप नाही. अँटिगाच्या पंतप्रधानांनी सांगितले की, मेहुल चोक्सी यांची हवी तेव्हा भारतीय अधिकारी येऊन चौकशी करू शकतात, तर त्यांनाही चौकशीत सहभागी व्हायचे असेल तर. ते म्हणाले की हे प्रकरण कोर्टात सुरू असल्याने त्यांचे सरकार या प्रकरणात काहीही करू शकत नाही.
‘हे माहित असते तर नागरिकता दिली नसती’
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले कि, त्याच्या घोटाळ्याविषयी माहिती असते तर त्याला देशाची नागरिकता दिली नसती. त्याला भारताकडे सोपवले जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तो आमच्या देशाचे नाव खराब करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले. अँटिग्वामध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था असून त्याचे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, मेहुल चोक्सी आणि निरव मोदी हे दोघेजण पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी फरार असून या दोघांनी जवळपास 14 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सरकार या दोघांच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न करत आहे.
Visit : bahujannama.com