मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – केंद्रसरकारच्या संमतीशिवाय कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनशी संलग्न शाळा चालविण्यात येत असल्याची थेट याचिका दाखल करणाऱ्या आरोपीला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने ५ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. त्याचबरोबर त्याच्या विरोध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही हायकोर्ट रजिस्ट्रारला देण्यात आले आहेत. तसेच दंड भरल्याशिवाय एकही जनहित याचिका दाखल करण्यास परवानगी देऊ नका, असे आदेशही देण्यात आले आहे. याआधीही आरोपीने विविध विषयांवर उठसूट याचिका दाखल केल्याने हायकोर्टाने अनेकदा त्यांची हजेरी घेतली होती. सपन श्रीवास्तव असे या याचिकाकर्त्यांचे नाव आहे.
माहिती अधिकारी कार्यकर्ता सपन श्रीवास्तव यांनी न्यायालयात अनेकदा विविध विषयांवर याचिका दाखल केल्या आहेत. त्यात आता त्यांनी कौन्सिलच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी संगितले होते कि, सुमारे २ हजार शाळा कौन्सिलशी जोडलेल्या आहेत. ज्यात आयसीएसई आणि आयएससी या शाळांचा समावेश आहे. या शाळांना केंद्र सरकारने परवानगी दिलेली नसल्याने, या शाळेतील मुलांचे भवितव्य धोक्यात असल्याचे या याचिकेत नमूद केले आहे.
‘परंतु कॉन्सिलचे स्वतःचे शिक्षण मंडळ असते , त्यामुळे केंद्र सरकारच्या परवानगीची त्यासाठी आवश्यकत्या नसते’, असा निकाल हारकोर्टाने दिला आहे. या सांदर्भात दखल घेत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भरती डांगरे यांच्या खंडपीठाने सपन श्रीवास्तव यांची याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाने रजिस्ट्रारला निर्देश देत सांगितले कि, येत्या चार आठवड्यांत दंडाची रक्कम वसूल करून हा निधी कौन्सिलकडे जमा करून घ्या . त्यानंतर आरोपीला जनहित याचिका दाखल करण्याची परवानगी द्या. परंतु आयएसीईने ती रक्कम नाकारल्याने हि निधीची रक्कम शालेय खर्चासाठी तसेच शैक्षणिक सामानासाठी खर्च करा असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. हा निधी गोळा करण्यासाठी श्रीवास्तव यांनी एका सामाजिक संस्थेच्या सांकेतिक स्थळावर पोस्ट टाकली होती. परंतु न्यायालयाने ती पोस्ट डिलीट करण्यास सांगितले असून आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही कॉउंसिलला देण्यात आले आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी