बहुजननामा ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एका ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वतःच्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्रिवेन्द्र कुमार असे या मृत ग्राम विकास अधिकाऱ्याचे नाव आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि दोन ग्रामप्रमुखांच्या दबावाखाली आणि दडपणाखाली आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी कुमार यांच्या खिश्यातून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमार माऊ जिल्ह्यातील रहिवासी असून ते लखीमपूर खेरी जिल्ह्यातील कुंभी गावात ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत होते. दरम्यान, कुमार यांच्या मृत्यूच्या आधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये भारतीय किसान युनियनचे नेते राकेश कुमार सिंह आणि श्यामू शुक्ला यांनी त्यांना भर सभेत व्यापीठावर बोलवत आहेत आणि त्यांना अपशब्दांनी अपमानित करत आहेत. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील कुंभी ब्लॉकच्या अमीन नगर येथे काही दिवसांपुर्वी राकेश कुमार सिंह आणि श्यामू शुक्ला यांच्या नेतृत्वात किसान पंचायतीची बैठक सुरू होती.
या बैठकीत राकेश कुमार सिंह आणि श्यामू शुक्ला यांनी ग्रामविकास अधिकारी त्रिवेंद्र कुमार यांना त्यांच्या व्यासपीठावर बोलावले. या बैठकीत त्यांनी कुमार यांचा अपमान केला. सर्व ग्रामस्थापुढे झालेला अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी त्यांचे आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पोलिस अधिकाऱ्यांनी मृतक ग्रामविकास अधिकारी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्राम विकास अधिकाऱ्यांनी कलम बंद संप पुकारला आहे. जोपर्यत कुमार यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा संप सुरु ठेवण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी