बहुजननामा ऑनलाइन – केंद्र सरकारने नुकताच देशातील बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) बॅंकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ( ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बॅंकांचे विलीनीकऱण झाल्याने पीएनबी बॅंक आता देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बॅंक असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या आठवड्यातच राज्य सरकारच्या बँकांच्या विलीनीकरणाची नवीन योजना जाहीर केली. विलीनीकरणानंतर एका वर्षाच्या आत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या २७ वरून १२ वर आली आहे.
या विलीनीकरणामुळे बॅंकाच्या ग्राहकांना हे सहा बदल करावे लागणार आहेत.
१. आपला खाते क्रमांक आणि इंटरनेट ग्राहक आयडी बदल होऊ शकतो. म्हणजेच इतर दोन बँक पीएनबीमध्ये विलीन झाल्यावर आपल्याला नवीन खाते क्रमांक आणि ग्राहक आयडी मिळेल. यासाठी तुमचा चालू ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर बँकेकडे अपडेट असायला पाहिजे. याद्वारे बँक आपल्या फोन नंबर आणि ईमेल आयडीवरील कोणत्याही बदलांची माहिती नेहमी पाठवते.
२. विलीनीकरणामुळे ग्राहकांना त्यांचे चेकबुक बदलावे लागेल. जर तुमचे खाते ओबीसी किंवा युनायटेड बँकेत असेल तर तुम्हाला तुमचे चेकबुक बदलावे लागणार आहे. सध्याचे चेकबुक काही काळ वैध राहील, परंतु अखेरीस ते ज्या बँकेत विलीन करण्यात आले आहे. त्या बॅंकेचे चेकबुक तुम्हाला घ्यावे लागणार आहे. मात्र विलीनीकरणाचा कोणताही परिणाम पीएनबी ग्राहकांवर होणार नाही.
३. विलीनीकऱण झालेल्या बॅंकांच्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड दिले जातील. हे नवीन खाते क्रमांक आणि आयएपएससी कोड त्यांना आयकर विभाग, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) इत्यादीं सर्व महत्वाच्या ठिकाणी हे सर्व तपशील अपडेट करावे लागणार आहे.
४. विलीनीकरणानंतर नवीन बँकेत बरेच बदल होतील. यासाठी तुम्हाला आपला ईसीएस बदल करावा लागेल. यासाठी तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधून नवीन ईसीएससाठी मागणी करा. आवश्यक असल्यास, तुमचा ईसीएस संबंधित फॉर्म ऑनलाइन किंवा विमा कंपनीच्या शाखेत भरावा लागणार आहे. ऑटो डेबिट किंवा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) साठी तुम्हाला नवीन एसआयपी नोंदणी आणि सूचना फॉर्म भरुन घ्या. तसेच, कर्जाच्या ईएमआयसाठीही तेच करावे लागेल.
५. विलीनीकरणामुळे तुमच्या बॅंकेचा पत्ता बदलू शकतो. विलीनीकरणानंतर बँका त्यांच्या काही शाखा बंद करू शकते. म्हणजे त्या इमारतीत किंवा जवळपास ओबीसी बॅंक आणि युनायटेड बॅंक असेल तर ती तर ती त्याच शाखेत विलीन केली जाईल. त्यामुळे बँकेच्या शाखेचा पत्ता बदलला जाऊ शकतो. म्हणूनच आपण नवीन शाखेत लागू होणारा नवीन आयएफएससी आणि एमआयसीआर कोड लक्षात ठेवला पाहिजे, कारण आपल्याला निधी हस्तांतरण आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी तो आवश्यक असतो.
६. ठेव, कर्ज दरामध्ये कोणताही बदल होणार नाही. बँकेने दिलेला मुदत ठेव दर लागू केला जाईल. मात्र सध्याच्या मुदत ठेवींवरील मॅच्युरिटी च्या तारखेपर्यंत सुरवातीपासूनच लागू केलेला व्याजदर मिळेल. त्याचप्रमाणे कर्जावरील व्याजदर देखील करारानुसार सुरु राहतील. नवीन घटकाच्या व्याज दरात बदल होईपर्यंत गृह कर्जाचा सध्याचा व्याजदरही तोच राहील.
पीएनबीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता.५) बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विलीनीकरणाला मान्यता देण्यात आली. विलीनीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अर्थ मंत्रालयाला या तिन्ही बँकांकडून सूचना मिळाल्यानंतर ही बैठक बोलविण्यात आली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी सल्लामसलत केल्यानंतर अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पर्यायी यंत्रणेने या विलीनीकरणास पुढे जाण्यास परवानगी दिली आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी