बहुजननामा ऑनलाइन : भारतीय सिनेश्रुष्टीतील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे. पेंगूइन हाऊस इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहे. नुकतीच या संदर्भातील माहिती पेंगुइन रैंडम हाउस इंडिया यांनी दिली. ” श्रीदेवी : गर्ल , वूमन सुपरस्टार ” असे या पुस्तकाचे शीर्षक असून सत्यार्थ नायक यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी या पुस्तक प्रकाशनास संमती दर्शवली आहे.
पेंगूइन यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या पुस्तकात श्रीदेवी यांच्या संदर्भात तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडींचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात श्रीदेवी यांनी सिद्ध केले कि , पुरुषप्रधान असणाऱ्या फिल्म इंडस्ट्री मध्ये एक महिला कलाकार कशी नावारूपाला येऊन , एक मोठी अभिनेत्री बनू शकते. पेंगूइन रँडम हाउस यांच्या तर्फे या पुस्तकाचे प्रकाशन ऑक्टोबर २०१९ मध्ये करण्यात येईल. प्री – ऑर्डर साठी हे पुस्तक ई – कॉमर्स वेबसाईट वर उपलब्ध आहे.
सत्यार्थ नायक यांनी सांगितलं कि, ” मी पहिल्यापासून श्रीदेवी यांचा खूप मोठा चाहता आहे. या पुस्तकाने मला भारताच्या चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावंत कलाकाराच्या जीवनावर लिखाण करण्याची संधी दिली. यासाठी मोठमोठ्या कलाकारांसोबत चर्चा करण्याच्या अनुभव मला मिळाला, श्रीदेवी यांच्या सोबत काम केलेल्या कलाकारांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या पुस्तकात एका बाल कलाकारापासून भारतीय चित्रपटातील पहिली महिला सुपरस्टार बनण्याचा तिचा प्रवास अधोरेखित केला आहे.” दरम्यान फेब्रुवारी २०१८ मध्ये वयाच्या ५४ वर्षी श्रीदेवी यांचे निधन झाले होते.