नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान संघाचे गोलंदाजीचे माजी प्रशिक्षक ग्रान्ट फ्लॉवर यांनी पाकिस्तानला घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानात स्वातंत्र्य नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाकिस्तान हा देश सुरक्षित नाही असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय प्लॉवर असंही म्हणाले की, या गोष्टी देशात राहून तुम्हाला अधिक चीड आणतात.
2014 पासून पाकिस्तानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असणाऱ्या फ्लॉवर यांचं कंत्राट मागील आठवड्यातच संपलं आहे. यानंतर त्यांना कोणतीही मुदतवाढ मिळाली नाही. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी आपले पाकिस्तान संघाचे अनुभव सांगितले आहेत. पाकिस्तानात राहत असताना कोणती गोष्ट तापदायक होती असं त्यांना विचारल्यानंतर फ्लॉवर यांनी स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांच्या संकोचाचा मुद्दा उपस्थित केला होता.
श्रीलंकेचा संघ 2009 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. यावेळी त्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर जगातील खूपच थोडे संघ असे आहेत ज्यांनी पाकिस्तानचा दौरा केला आहे. याच मुलाखतीत फ्लॉवर यांना प्रश्न विचारण्यात आला की, कोणत्या गोष्टीची आठवण तुम्हाला नको आहे. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “माजी खेळाडूंच्या मागे राजकारण करणं, टीव्ही वाहिन्यांमागे असलेलं राजकारण मला अजिबात आठवायचं नाहीये.” असं फ्लॉवर यांनी यावेळी सांगितलं.