बहुजननामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आह. रोज काही ना काही खुलासे या प्रकरणी होताना दिसत आहेत. रिया चक्रवर्तीबद्दल देखील आश्चर्यकारक खुलासे होताना दिसत आहेत. सुशांतवर जादूटोना करणं आणि त्याला ड्रग्स देणं असे आरोप रियावर आहेत. सुशांत गेल्यानंतर रियानं पहिल्यांदाच एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली आहे. सुशांतच्या कुटुंबावर तिनं अनेक गंभीर आरोप केले आहेत. या मुलाखतीत रियानं तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मला सुशांतकडून बाळ हवं होतं’
मुलाखतीत बोलताना रिया म्हणाली की, “आम्ही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं. मला सुशांतकडून एक बाळ हवं होतं जे हुबेहूब त्याच्यासारखं दिसलं असतं. मी त्याला लिटील सुशी अशी हाक मारणार होते. तो अगदी त्याच्या सारखाच दिसला असता. आम्ही नेहमीच एका कपलसारखं बोलायचो.
‘आमची मैत्री प्रेमात कधी बदलली कळलंच नाही’
पुढं रिया म्हणाली की, “मला चांगलंच आठवत आहे की, आमची भेट कशी झाली होती. सर्वात आधी सुशांतनं मला प्रपोज केलं होतं. सुशांत खूप इमानदार होता. सुशांत आणि त्याच्या वडिलांचं रिलेशन ठिक नव्हतं. यामुळं सुशांत कायमच टेंशनमध्ये असायचा.”
8 जूनला नेमकं काय झालं ?
रिया म्हणाली की, “8 जून रोजी डॉक्टर सुजेन वॉकर यांच्यासोबत माझं एक थरेपी सेशन बुक होतं. हे सेशन सकाळी 11.30 वाजता होणार होतं. 8 जूनला सुशांतचं घर सोडून जाण्याचा माझा कोणताही विचार नव्हता हे यातून स्पष्ट होत आहे. हे थेरपी सेशन मी माझ्या घरी करू शकत नव्हते. माझी अजिबातच इच्छा नव्हती की, माझ्या कुटुंबानं मला अशा स्तिथीत बघावं. कोणतेही आईवडिल आपल्या मुलांना असं पाहू शकणार नाहीत.”
रिया पुढं म्हणते, “जेव्हा माझं हे सेशन होणार होतं तेव्हा मी सुशांतला सांगितलं होतं. परंतु तो मला यासाठी नाही म्हणाला. आज थेरपी सेशन इथं नको करूस. तू तुझ्या घरी जा असं तो मला म्हणाला. मी त्याला म्हटले की, मला थेरपी सेशन करून जाऊ दे. तर तो यालाही नाही म्हणाला. त्यानं मला थेरपी सेशनआधीच जायला सांगितलं. त्यानं सांगितलं की, त्याची बहिण येणार आहे. तिचा फोन आला होता.
‘सुशांतच्या कुटुंबानं माझं आयुष्यच संपवून टाकलं’
रिया म्हणाली, “मी त्याची एवढी काळजी घेतली. त्याच्याजवळ राहून त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. इतकं सगळं करूनही आज मला सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं जात आहे. त्यात सुशांतचे कुटुंबीय अशा प्रकारे मला त्रास देत आहेत. त्यांनी तर माझं जगणंच मुश्किल केलं आहे. माझं आयुष्यच त्यांनी संपवून टाकलं आहे.”
‘माझ्यासह आता माझ्या आई व भावावरही येईल वाईट वेळ’
रिया स्वत:च्या कुटुंबाबद्दल बोलताना म्हणाली की, “माझ्या घराचे हप्ते मी कसे फेडणार? कदाचित यापुढं माझा भाऊ कॉलेजमध्ये जाऊ शकणार नाही. माझी आई या सगळ्या टेंशनमध्ये कधीही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ शकते अशी तिची अवस्था झाली आहे. यापुढं माझं काय होणार ? मी एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे. जिथं आदर नाही तिथं काहीच नाही. सुशांतच्या मृत्यूचा विनोद करून टाकलाय. सुशांतच्या मृत्यूचा तपास कोणीही करो, मला काहीच फरक पडत नाही. कारण माझ्याकडं लवपण्यासारखं काहीच नाही.” असंही रियानं यावेळी सांगितलं.