मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदविस वाढत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात कोरोनोचे तब्बल 14361 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात 331 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 47 हजार 995 वर जावून पोहचली आहे.
14,361 new #COVID19 cases and 331 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 7,47,995 including 1,80,718 active cases, 5,43,170 recoveries and 23,775 deaths: State Health department pic.twitter.com/Om3UaKaR12
— ANI (@ANI) August 28, 2020
राज्यात सध्या 1 लाख 80 हजार 718 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आतापर्यंत तब्बल 5 लाख 43 हजार 170 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळं राज्यात 23 हजार 775 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 11 हजार 607 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 72.62 टक्के आहे. राज्यातील कोरोना रूग्णांचा मृत्यू दर हा 3.18 टक्के आहे.